बॅलन्स ट्रान्सफर

बॅलन्स ट्रान्सफर

तुमच्या होम लोन/LAP EMI वर अधिक बचत करा आणि आमच्या टेकओव्हर योजनांद्वारे तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी तुमच्या बचतीचा आनंद घ्या.

 • तुमचे गृहकर्ज/इतर बँकेकडून घेतलेले एलपीए/वित्तीय संस्थेकडून GICHFL कडे हस्तांतरित करा आणि बांधकाम, नूतनीकरण आणि वैयक्तिक गरजांसाठी अधिकचे कर्ज मिळवा.
 • आकर्षक व्याजदर.

 

1.कर्जाची मुदत

कमाल 30 वर्षे
*हे तुमच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही (पगारदार व्यक्तींसाठी ६० वर्षे आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींसाठी ७० वर्षे)

2. कर्जाची रक्कम

 • एन.एच.बी च्या नियमांनुसार कर्जाची रक्कम आणि बांधकाम कर्ज घ्या
 • नूतनीकरणासाठी कर्जाची रक्कम + १५ लाख अधिकची रक्कम घ्या.
 • कर्जाची रक्कम + १० लाख तारण कर्ज म्हणून घ्या.

3. व्याज दर आणि शुल्क

परिवर्तनीय दर
सर्वोत्तम दर जाणून घेण्यासाठी कृपया तुमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा

## व्याजाचा अंतिम दर क्रेडिट इतिहास, प्रोफाइल, कर्जाची रक्कम, कालावधी आणि मालमत्तेचा प्रकार यावर अवलंबून असेल.अधिक जाणून घ्या:

 

4. परतफेडीची पद्धत

तुम्ही तुमचे गृहकर्ज ईएमआय याद्वारे भरू शकता:

 • इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस (ECS)/ नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH)- तुमच्या बँकेला दिलेल्या मानक सूचनांवर आधारित
 • पोस्ट डेटेड चेक (PDCs) – तुमच्या पगार/बचत खात्यावर काढलेले. (केवळ ज्या ठिकाणी ECS/NACH सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी)

5. विमा

 • मोफत मालमत्ता विमा
 • मोफत अपघाती मृत्यू विमा
 • कोटक लाइफ इन्शुरन्स, बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स द्वारे जीवन विमा ( एकवेळच्या प्रीमियम विरुद्ध पर्याय) व्यवस्था.

6. कर लाभ

आयकर अधिकारी विशिष्ट वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तींना काही फायदे आणि सवलत देतात.

प्राप्तिकर कायद्याच्या कलम २४ मध्ये, प्राप्त मालमत्ता, बांधकाम, दुरुस्ती, नूतनीकरण किंवा पुनर्बांधणीसाठी घेतलेल्या भांडवलावर दिलेले व्याज हे सूट मिळण्यास पात्र आहे. रु.२,००,००० ही स्वमालकीच्या मालमत्तेच्या बाबतीत सूट मिळण्यास पात्र असलेली कमाल रक्कम आहे आणि भाड्याने दिलेल्या मालमत्तेसाठी वजावटीच्या रकमेची मर्यादा नाही

आयकर कायद्याच्या कलम ८० C नुसार, आर्थिक वर्षात गृहकर्जाच्या मूळ रकमेची परतफेड केल्यावर तुम्हाला उत्पन्नातून कमाल रु. १,५०,००० सूट मिळू शकते. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क किंवा अशा घराच्या मालमत्तेच्या करधारकाला हस्तांतरण करण्याच्या उद्देशाने भरलेले इतर खर्च देखील या रकमेअंतर्गत विचारात घेतले जातात.

ईएमआय परीगणक:

गृह कर्ज ईएमआय परीगणक हा एक मूलभूत परीगणक आहे जो तुम्हाला मूळ रक्कम, कर्जाचा कालावधी आणि व्याज दराच्या आधारावर ईएमआय, मासिक व्याज आणि मासिक कमीत कमी बॅलन्स ठेवण्यास मदत करतो.

कृपया लक्षात घ्या की गृह कर्ज ईएमआय परीगणक तुम्हाला अंदाजे रक्कम किती असेल हे सांगण्यासाठी तयार केले गेले आहे आणि ते पूर्णपणे बरोबर मानले जाऊ नये. .

पात्रता परीगणक:

गृहकर्ज पात्रता परीगणक (Calculator) मार्गदर्शक म्हणून काम करते. हे तुम्हाला तुमच्या गृहकर्जासाठी अंदाजे किती रक्कम मिळू शकेल हे सांगते.

केवायसी कागदपत्रे

ओळखपत्र आणि पत्ता पुरावा (कोणताही आवश्यक)

 • पॅन कार्ड (अनिवार्य, कर्ज पात्रता परीगणनेसाठी उत्पन्नाचा विचार केल्यास)
 • वैध पासपोर्ट
 • मतदार ओळखपत्र
 • चालक परवाना
 • आधार कार्ड

रहिवासी पुरावा (कोणताही आवश्यक)

 • युटिलिटी बिल: वीज, टेलिफोन, पोस्टपेड मोबाईल, पाणी बिल इ.
 • शिधापत्रिका
 • मालकाकडून पत्र
 • बँक स्टेटमेंट/पास बुकची प्रत ज्यावर पत्ता लिहिलेला असेल
 • वैध भाडे करारपत्र
 • विक्री करार

उत्पन्नाची कागदपत्रे

पगारदार व्यक्ती

 • मागील १२ महिन्यांच्या पगाराच्या स्लिप किंवा पगार प्रमाणपत्र*
 • मागील १२ वर्षाच्या बँक स्टेटमेंटची प्रत (पगार खाते)
 • फॉर्म १६/ ट्रेसेस * जर ओव्हरटाईम आणि इन्सेंटिव्ह सारखे परिवर्तनशील घटक आढळून आले तर , मागील सहा महिन्यांच्या पगाराच्या स्लिप्स आवश्यक आहेत

स्वयंरोजगार व्यावसायिक

 • व्यावसायिकांसाठी पात्रता प्रमाणपत्र : सी.ए, डॉक्टर किंवा आर्किटेक्ट
 • मागील तीन वर्षांच्या आयकर रिटर्नची प्रत, उत्पन्नाच्या गणनेसह
 • मागील तीन वर्षांच्या पी/एल खात्याची प्रत, परिशिष्ट आणि ऑडीट केलेल्या बॅलन्सशीटसह जेथे लागू असेल तेथे.
 • मागील १२ महिन्यांचे बँक स्टेटमेंट (बचत खाते, चालू खाते आणि O/D खाते)

बिझनेस क्लास

 • तुमच्या मागील तीन वर्षांच्या आयकर रिटर्नची प्रत, उत्पन्नाच्या गणनेसह
 • मागील तीन वर्षांच्या पी/एल खात्याची प्रत, परिशिष्ट आणि ऑडीट केलेल्या बॅलन्सशीटसह जेथे लागू असेल तेथे.
 • व्हॅट किंवा सेवा कर रिटर्न किंवा जीएसटी किंवा टीडीएस प्रमाणपत्र
 • मागील १२ महिन्यांचे बँक स्टेटमेंट (बचत खाते, चालू खाते आणि O/D खाते)
 • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र

मालमत्तेची कागदपत्रे

 • बिल्डरकडून वाटप पत्र
 • नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची पावती
 • निर्देशांक- ii
 • बिल्डरकडून एनओसी
 • स्वतःच्या योगदानाची पावती ( ओसीआर)
 • सर्व बिल्डर लिंक्ड दस्तऐवज (जीआयसीएचएफएल द्वारे मंजूर नसलेल्या किंवा पूर्वी निधी न दिलेल्या प्रकरणांसाठी लागू)
 • विकास करार
 • भागीदारी करार
 • विक्री करार
 • टायटल सर्च रिपोर्ट
 • एन.ए ऑर्डर
 • भोगवटा प्रमाणपत्र
 • बांधकाम आणि नूतनीकरण प्रकरणात बांधकामाचा अंदाज
 • वित्तीय संस्था/बँकेकडील कागदपत्रांची यादी
 • संबंधित वित्तीय संस्थेकडून मागील एक वर्षापासून कर्ज परतफेड ट्रॅकसह थकित कर्ज

टीप: मूळ कागदपत्रे केवळ पडताळणीच्या उद्देशाने आवश्यक आहेत