तुम्ही गृह निर्माण कर्जावरील देयक दाखवून कर लाभ मिळवू शकता. असे करण्यासाठी, तुम्हाला आयकर प्रमाणपत्र मिळवावे लागेल जे तुम्हाला वर्षातून एकदा दिले जाईल. यामध्ये व्याजावरील एकूण रक्कम आणि वर्षभरातील वाढणारी मुद्दल यांचा समावेश असतो. स्वतःच्या मालकीची मालमत्ता असल्यास कर लाभ घेण्याचा दावा करायलाच हवा.

तुम्ही हे तुमचे वैयक्तीक आयकर विवरणपत्र म्हणुन जमा करू शकता आणि नंतर तुमची जबाबदारी (लायबिलीटी) काढू शकता.

चालू आर्थीक वर्षासाठी चालू नियमांअंतर्गत परवानगी असलेली अधीकतम रक्कम तपासण्याचे लक्षात ठेवा.

 

A. करलाभ

I . आयकरअधिनियम 1961 अंतर्गत

a) कर्जधारकालागृहनिर्माणकर्जाचेलाभ:
i.) आयकर अधिनियम 1961 च्या कलम 24(b) च्या दुसऱ्या तरतूदीनूसार, 1 एप्रील 1999 नंतर खरेदी केलेल्या घराचे संपादन/बांधकाम करण्याच्या उद्देशाने घेतलेल्या कर्जावरील व्याज निगमीत करण्यासाठी रूपये 1,50,000 ची रोख उपलब्ध आहे, यासाठी ते बांधकाम कर्ज रक्कम मिळाल्यापासून 3 वर्षांच्या आत पूर्ण होणे गरजेचे आहे.

ii.) जर मालमत्ता कर्ज रकमेच्या बाहेर संपादन केल्या गेली/बांधली गेली, तर अशी मालमत्ता संपादन किंवा बांधल्या गेल्याच्या कालावधी पूर्वी काही कालावधीसाठी व्याज हा यानंतर लगेचच्या 4 वर्षांसाठी समान हफ्त्यांमध्ये निगमीत केला जातो.

iii.) वरील निगमन हे (i) आणि (ii) मध्ये दर्शवले आहे आणि कर्जधारकाने कर्ज रक्कम दाखवणारे आणि मालमत्ता संपादन/बांधकाम करण्यासाठी द्यायचे व्याज यांचे प्रमाणपत्र जमा केल्यानंतरच वरील बाबीची परवानगी दिली जाते.

iv.) आयकर अधिनियम 1961 च्या कलम 80सी अंतर्गत रूपये 1,00,000 पर्यंत हाऊसींग लोन वरील परतफेडीची मुद्दल ही व्यक्तीच्या किंवा एचयुएफच्या निगमनासाठी जबाबदार ठरते.

II. संपत्तीकरअधिनियम, 1957

a) संपत्ती कर अधिनियम, 1957, कलम 5(1) अंतर्गत व्यक्ती स्वतःच्या मालकीची एक मालमत्ता वापरू शकतो व ती संपत्ती करापासून मुक्त होण्यास पात्र ठरते.

b) व्यक्तीकडे, एकापेक्षा जास्त मालमत्ता असतील, तर त्यावर संपत्ती कर नियम 1958 नूसार संपत्ती कर आकारला जातो आणि 15,00000 रूपयांवर संपत्ती कर लागू होतो. तरिसुद्धा जर सांगीतलेल्या कोणत्याही मालमत्तेवर जबाबदारी असेल, तर त्याचे संपत्ती कर लागू होणाऱ्या संपत्तीमधुन निगमन केले जाते.

c) व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त संपत्ती असेल आणि दुसरी मालमत्ता आधीच्या वर्षात 300 पेक्षा जास्त दिवसांसाठी भाडेतत्वावर दिलेली असेल, तर त्याला संपत्ती कर लागू होण्यास पात्र समजले जात नाही.

 

B. कर सूचितार्थ

कलम 80 C अंतर्गत निगमनासाठी दावा केलेल्या मालमत्तेचे जर व्यक्तीने आर्थीक वर्षांच्या शेवटपासून 5 वर्ष संपण्याआधीच हस्तांतरीत केली तर हस्तांतरीत करण्यात आलेल्या वर्षी त्याला निगमनाची सोय मिळणार नाही आणि आधी मिळालेले निगमन व्यक्तीच्या हस्तांतरीत करण्याच्या वर्षी उत्पन्नामध्ये जमा करण्यात येईल व त्यानूसार कर आकारला जाईल.

कंपनी आणि तीच्या भागधारकांसाठी कर लाभ

B. कंपनीच्या रहिवाशी सदस्यांसाठी, 1961

1.) देशांतर्गत कंपनीकडून प्राप्त झालेले लाभांश उत्पन्न आयकर अधिनियम 1961 च्या कलम 10(34) अंतर्गत वगळले आहे.

2.) भागधारक या अधिनियमाच्या कलम 10 (38) अंतर्गत बारा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी कंपनीच्या शेयर करिता कर भरावा लागू नये यासाठी त्याने खालील बाबी पूर्ण कराव्या लागतील –

अ) अशा इक्विटी शेयरच्या विक्री व्यवहाराची 1 ऑक्टोबर 2004 ला किंवा त्यानंतर नोंद करायला हवी.

ब) वित्त अधिनियम 2004 (क्रमांक 2) च्या प्रकरण 7 अंतर्गत सुरक्षा व्यवहार करा करिता या व्यवहारावर शुल्क आकारण्यात येते.
या कलमाच्या अटी नूसार स्वतंत्र व्यक्ती किंवा एचयुएफ च्या उदाहरणामध्ये, अशा लघु कालावधीमध्ये मिळवलेल्या भांडवलामूळे कमी झालेले एकूण उत्पन्न हे कर आकारण्यासाठीच्या अधिकतम मूल्यापेक्षा कमी असेल, तर असे कमी कालावधीचे भांडवल एकूण उत्पन्नमधुन कमी केले जाते जेणेकरून त्यावर कर आकारला जाणार नाही आणि लघु कालावधीमधील भांडवलाच्या शिल्लक रकमेवरील कर हा दहा % या दराने नोंद केला जातो.

3.) कंपनीचे शेयर हस्तांतरीत करून मिळालेले कमी कालावधीच्या भांडवलावर कलम 111 Aअंतर्गत खालील अटी समाधानकारक असतील तर10% दराने कर आकारण्यात येतो ( अधीक लागू अधिभार आणि शिक्षण कर)

अ) अशा इक्विटी शेयरच्या विक्री व्यवहाराची 1 ऑक्टोबर 2004 किंवा त्यानंतर नोंद झाल्यास.
ब) हा व्यवहार वित्त अधिनियम (क्रमांक2) च्या प्रकरण 7 अंतर्गत सुरक्षीत व्यवहारासाठी आकारणी योग्य असल्यास.

पुढे, कंपनी शेयरची सार्वजनीक वाटणी भांडवल वाटणीसाठी पात्र असेल आणि दीर्घकालीन भांडवल जर कंपनी शेयर मध्ये गुंतवलेले असेल तर ते या अधिनियमाच्या कलम 54 ED च्या लाभासाठी पात्र असते.


संपत्ती कर अधिनियम 1957 अंतर्गत.

देशांतर्गत कंपनीमधील शेयर संपत्ती कर अधिनियम 1957 अंतर्गत “मालमत्ता” गृहीत धरली जात नाही, त्यामुळे त्यावर संपत्ती कर आकारला जात नाही

कंपनीच्या अ-रहिवाशी सदस्यांसाठी

C. आयकरअधिनियम 1961 अंतर्गत

1.) या अधिनियमाच्या कलम 115 E अंतर्गत, कंपनीमधील शेयर जर अ-रहिवाशी भारतीयांसाठी विदेशी मुद्रेमध्ये रूपांतरीत होणारे असतील, तर अ-रहिवाशी भारतीयांना मिळालेले भांडवल 12 महिन्यांच्या कालावधीसाठी हस्तांतरीत केलेले शेयर यांवर 10 % कर (अधीक लागू अधिभार आणि शिक्षण कर) लागू केला जातो. (अधिनियमाच्या कलम 115D च्या सुविधेमध्ये संदर्भ दिला असू शकतो).

2) आयकर अधिनियम 1961 च्या 115 F या कलम अंतर्गत, वरील मुद्द्यामध्ये दिलेल्या दीर्घकालीन भांडवल हे पूर्णपणे आयकरामधुन वगळले आहे / त्याने/तीने पूर्ण किंवा अर्ध भाग हस्तांतरीत करण्याच्या तारखेच्या 6 महिन्यांमध्ये आयकर अधिनियम 1961 अंतर्गत येणाऱ्या कलम 115C (F) मध्ये विशीष्ट मालमत्ता म्हणुन गुंतवले असेल तर त्याला सुद्धा वगळले आहे. तरिसुद्धा, वगळलेली रक्कम ही प्राप्तीच्या तीन महिन्यांमध्ये पैस्यांमध्ये रूपातंरीत करण्यात आल्यास कलम 115 F (2) अंतर्गत त्यावर कर आकारण्यात येतो.

3) या अधिनियमाच्या कलम 115G अंतर्गत, अ-रहिवाशी भारतीयांचे उत्पन्न जर केवळ गुंतवणूक उत्पन्न असेल किंवा दीर्घकालीन भांडवलामधून झालेले असेल किंवा असलेल्या मालमत्तेचे विदेशी मुद्रेमध्ये रूपांतरीत केल्याने प्राप्त झालेले असेल तर त्यांना उत्पन्नाचा परतावा तयार करण्याची आवश्यकता नाही आणि या स्वरूपाचे उत्पन्न कर आकारण्यामधून वगळण्यात येते.

4) अधिनियमाच्या कलम 115-I अंतर्गत, अनिवासी भारतीय( म्हणजेच भारतीय नागरीक किंवा मूळ निवास भारतीय नसलेला परंतु भारतामध्ये रहाणारा व्यक्ती) व्यक्ती हा या आयकर अधिनियम 1961 च्या प्रकरण 12 A अंतर्गत येत नसेल तर त्याच्या किंवा तीच्या उत्पन्नावर या अधिनियमा अंतर्गत कर आकारण्यात येतो.
5) अधिनियमाच्या कलम 10(34) च्या आधारे, अधिनियमाच्या कलम 115-O अंतर्गत येणाऱ्या देशांतर्गत कंपनीमधुन लाभांश उत्पन्न मिळवले असेल, तर त्याला शेयरहोल्डरच्या हातामधुन कर आकारण्यापासून वगळण्यात येते.

.

6.)भारतामधून कोणताही डबल टॅक्सेशन अव्हॉइडन्स करार (डीटीए) कोणत्याही इतर देशामध्ये सवलत कर दर किंवा कंपनी शेयरमधील गुंतवणूकीमधील उत्पन्नामधुन वगळण्यासाठी नोंद झाल्यास, ही फायदेशीर सुविधा त्या संबंधित आयकर अधिनियम 1961 च्या सुविधेवर प्रबळ होईल.

संपत्ती कर अधिनियम 1957 अंतर्गत.

देशांतर्गत कंपनीमधील शेयर हे संपत्ती कर अधिनियम 1957 अंतर्गत मालमत्ता नसतात, त्यामुळे त्यावर संपत्ती कर आकारला जात नाही.

विदेशी संस्था गुंतवणूकदारांसाठी

D. आयकर अधिनियम 1961 अंतर्गत

1) या अधिनियमाच्या कलम 115 AD(1) (b) (ii) अंतर्गत, कंपनीमधील शेयर 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी हस्तांतरीत करू मिळालेले लघु कालावधीच्या उत्पन्नावर 30 टक्क्याने कर आकारला जातो (अधीक लागू अधिभार).
2) या अधिनियमाच्या कलम 115 AD(1) (b) (iii) अंतर्गत, कंपनीमधील शेयर हस्तांतरीत करून मिळालेले दीर्घकालीन उत्पन्नावर 10 % दराने कर आकारला जातो (अधीक लागू अधिभार)
3) कंपनी शेयरवरील प्राप्त लाभांश च्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न आयकर अधिनियम 1961 मधील कलम 10(34) मधून वगळण्यात आले आहे.

4) भारतामधून कोणताही डबल टॅक्सेशन अव्हॉइडन्स करार (डीटीए) कोणत्याही इतर देशामध्ये सवलत कर दर किंवा कंपनी शेयरमधील गुंतवणूकीमधील उत्पन्नामधुन वगळण्यासाठी नोंद झाल्यास, ही फायदेशीर सुविधा त्या संबंधित आयकर अधिनियम 1961 च्या सुविधेवर प्रबळ होईल.

टीप:

1) वरील सर्व लाभ हे वित्त अधिनियम 2005 मधील दुरूस्तीनूसार चालू कर अधिनियमाप्रमाणे आहेत.
2) कंपनीला आणि तीच्या शेयरहोल्डरला मिळणाऱ्या कर लाभाची सद्यस्थिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशासाठी दिली आहे. कराच्या स्वाभावीक स्वरूपाच्या दृष्टीकोनातून, प्रत्येक गुंतवणूकदाराने तीच्या/त्याच्या शेयर मधील सहभागावर विशीष्ट कर कसे असतील याबद्दल त्याच्या/तीच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
3) वर दिलेले कर लाभ हे सर्वंकष आहेत आणि ते विस्तृत माहिती आणि कपंनीमधून मिळालेले सादरीकरण यांवर आधारीत आहे आणि कंपनीच्या व्यवसाय कार्य व कृती यांवर सुद्धा अवलंबुन आहेत. हे मत तयार करण्यासाठी सर्व शक्य असलेली काळजी घेतली असताना, एम.पी. चितळे अँड कंपनी ने कोणत्याही चुकांसाठी किंवा येथे वगळण्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीला होणाऱ्या नूकसानीसाठी जबाबदारी घेतलेली नाही.
4) येथे दिलेली कलमे ही आयकर अधिनियम 1961 ची कलमे आहेत.

 

कंपनीसाठी

A. A) आयकर अधिनियम 1961 अंतर्गत

1. 1) आयकर अधिनियम 1961 अंतर्गत येणाऱ्या कलम 112 च्या सुविधेनूसार, कंपनीमधून प्राप्त होणारे दीर्घकालीन भांडवलावर कंपनीला लागू असलेल्या 35 % या सामान्य दराने कर आकारण्यात येतो.

  • जर दीर्घकालीन भांडवल 20 % दराने सूचीकरण सह नोंद केले असल्यास (अधीक लागू अधिभार)
  • जर दार्घकालीन भांडवल 10 % दराने सूचीकरणाशिवाय नोंद केले असल्यास (अधीक लागू अधिभार)

कंपनी दीर्घकालीन भांडवल प्राप्तीसाठी कर माफीसाठी दावा करण्यास पात्र असते. या कलमांमधील अटी पूर्ण झाल्यास विशीष्ट बॉन्ड/सुरक्षांमध्ये गुंतविलेली रक्कम 54इसी आणि 54इडी लागू होतात.

2.अधिनियमाच्या कलम 10(38) नूसार, खालील अटी पूर्ण करण्यासाठी बारा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी कंपनीच्या असलेल्या शेयरमधील दीर्घकालीन भांडवलावर कर भरण्यास कंपनी पात्र नसते,
(a) ) इक्विटी शेयरच्या विक्री व्यवहाराची नोंद 1 ऑक्टोबर, 2004 ला किंवा त्यानंतर झाली असल्यास.

(b) वित्त अधिनियम 2004 (क्रमांक2) मधील प्रकरण VIIअंतर्गत सुरक्षीत व्यवहार कर यासाठी व्यवहार आकारणीयोग्य असतात.

3. कंपनीचे शेयर हस्तांतरीत करून मिळालेले कमी कालावधीच्या भांडवलावर कलम 111A अंतर्गत खालील अटी समाधानकारक असतील तर 10% दराने कर आकारण्यात येतो ( अधीक लागू अधिभार आणि शिक्षण कर)
(a) इक्विटी शेयरच्या विक्री व्यवहाराची नोंद 1 ऑक्टोबर, 2004 ला किंवा त्यानंतर झाली असल्यास.

(b) वित्त अधिनियम 2004 (क्रमांक2) मधील प्रकरण VII अंतर्गत सुरक्षीत व्यवहार कर यासाठी व्यवहार आकारणीयोग्य असतात.

4. अनावशोषीत व्यवसाय/दार्घकालीन भांडवल नूकसान आणि भत्ते यांचे लाभ

कंपनीकडे अधिनियमा अंतर्गत अनावशोषीत भांडवल नूकसान आणि भत्ते असतात, जे खालील कलमांअतर्गत पुढील वर्षीच्या उत्पनामध्ये मिळवले जातात.

i. अधिनियमाच्या कलम 72 अंतर्गत, कंपनी पहिल्यांदा नूकसान नोंद केलेल्या वर्षानंतर ताबडतोब पुढील आठ करार वर्षांच्या कालावधीसाठी भांडवल नूकसान पुढे स्थीर करू शकते.
ii. अधिनियमाच्या कलम 32 नूसार, कंपनी आधीच्या वर्षीचे अनावशोषीत निगमन भत्ते अधिनियमा अंतर्गत पुढील वर्षांच्या व्यवसाय उत्पन्नामध्ये स्थीर करू शकते.

iii) अधिनियमाच्या कलम 74 अंतर्गत, कंपनी पहिल्यांदा नूकसान नोंद केलेल्या वर्षानंतर ताबडतोब पुढील आठ करार वर्षांच्या कालावधीसाठी भविष्यातील वर्षांमधील दीर्घकालीन भांडवल प्राप्ती विरूद्ध स्थीर करू शकते.

5. कंपनी आयकर अधिनियम 1961 च्या कलम 36(1) अंतर्गत दीर्घकालीन वित्ताच्या व्यवसायामधील लाभासाठी 40 % निगमनासाठी पात्र असते. हे निगमन तेव्हाच लागू होण्यासाठी कंपनीला विशेष स्तराचे निगमन राखावे लागते. एकूण रक्कम जर अशा राखीव साठ्यामध्ये शेयर भांडवलाच्या आणि कंपनीच्या सामान्य राखीव साठ्याच्या दुप्पट झाली, तर अशा रकमेवर निगमन रोखले जाते.

6. देशांतर्गत कंपनीमधून प्राप्त झालेले लाभांश उत्पन्न आयकर अधिनियम 1961 अंतर्गत येणाऱ्या कलम 10(34) मधून वगळले आहे.

7. अधिनियमाच्या कलम 10(35) अंतर्गत आणि त्यानूसार, कंपनीमधील खालील उत्पन्न वगळण्यात येतील.
i) अधिनियमाच्या कलम 10 च्या खंड (23 D) अंतर्गत येणाऱ्या म्युच्युअल फंड मधून येणारे उत्पन्न, किंवा

ii) विशीष्ट उपक्रमांअंतर्गत प्रशासनामधून प्राप्त झालेले उत्पन्न, किंवा

iii) विशीष्ट कंपनीमधील युनीट मधुन प्राप्त झालेले उत्पन्न.

संपत्ती कर अधिनियम 1957 अंतर्गत

15 लाख रूपयांच्या माफी च्या उद्देशाने, कंपनीच्या मालकीच्या मालमत्तेसाठी 1 % दराने संपत्ती कर अधिनियम 1957 अंतर्गत कंपनी संपत्ती कर भरण्यास पात्र असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*
Website