आपल्यापैकी बऱ्याच जणांना कर्जासाठी किती रक्कम ठरविली जाते याबद्दल माहिती नाही. काहीवेळेला, आपल्याला लक्षात येते की, एकाच कंपनीमध्ये सारख्याच पगारावर काम करणाऱ्या दोन व्यक्तींना कर्जाची वेगवेगळी रक्कम दिली जाते. हे कसे शक्य आहे?

कर्ज पात्रता ही दोन वेगवेगळ्या सुत्रावर आधारीत असते.

  • तुम्ही प्रत्येक महिन्यात कर्जाची किती रक्कम परतफेड म्हणुन देऊ शकता.
  • मालमत्तेच्या मूल्याची टक्केवारी.

चला आपण पहिले सुत्र समजावून घेऊया: परतफेड क्षमता

परतफेडीची क्षमता ही तुमच्या एकूण उत्पन्न आणि खर्च यांवर अवलंबुन असते. चला गृहीत धरूया की, तुमचे मासीक उत्पन्न 20,000 रूपये आहे आणि तुमचा मासीक खर्च 12,000 रूपये आहे तर तुम्ही 8000 रूपये प्रत्येक महिन्याला कर्जाची परतफेड रक्कम भरू शकता. ही रक्कम त्यानंतर पात्रता रक्कम म्हणुन कालावधीच्या संबंधीत काढली जाते. नक्कीच, तुम्ही जेवढी जास्त परतफेड करू शकता, तेवढी जास्त कर्जाची रक्कम तुम्ही मिळवू शकता.

हे इतके सोपे आहे का?

नाही. परंतु हे मुलभूत सुत्र आहे. परतफेड क्षमतेवर इतर घटक सुद्धा काम करतात. उदा., तुम्ही स्वतःचे घर खरेदी करत असल्याने तुम्ही सध्या भरत असलेल्या भाड्याच्या पैस्यामधील जर 2000 रूपयांची बचत करू शकलात तर तुमची परतफेड क्षमता (8000 रूपये अधीक 2000 रूपये इतकी होईल), यामुळे परिणामाने तुम्हाला मिळू शकणारी कर्जाची रक्कम वाढेल. आणखी, याच उत्पन्नासाठी, जास्त कालावधीसाठी कर्जाची रक्कम सुद्धा जास्त असू शकते, कारण तेवढ्याच रकमेसाठीची परतफेड रक्कम ही जास्त कालावधी मध्ये विभागली जाते.

 

उत्पन्न म्हणुन काय गृहीत धरले जाते?

कर्जधारकाच्या उत्पन्नासाठी काही महत्वाचे नियम खालीलप्रमाणे आहेत. सामान्यपणे खालीलपैकी कोणतेही उत्पन्नाचा प्रकार म्हणुन गृहीत धरले जात नाही

  • वैद्यकीय प्रतिपूर्ती, कार्यक्षमता बोनस किंवा एलटीए, कारण यापैकी कोणतेही नेहमी उपलब्ध नसतात, किंवा सारख्याच रकमेमध्ये सुद्धा नसतात.
  • व्याज उत्पन्न जर उत्पन्नाचा स्त्रोत म्हणुन सिद्ध होऊ शकले तर.
  • याच कारणांसाठी अतिरीक्त कामाचा वेळ.
  • खर्चाचे वाऊचर, भाड्यामधुन उत्पन्न इत्यादींचे कागदोपत्री पुरावे कायम असतील आणि पुरावाम्हणुन दिले जाऊ शकत असतील तर यांसारखे स्त्रोतांमधुन झालेले उत्पन्न

खर्चाचे वाऊचर, भाड्यामधुन उत्पन्न इत्यादींचे कागदोपत्री पुरावे कायम असतील आणि पुरावाम्हणुन दिले जाऊ शकत असतील तर यांसारखे स्त्रोतांमधुन झालेले उत्पन्न

मालमत्तेच्या भागीदारी मालकीमध्ये, दोन्ही अर्जदारांचे उत्पन्न एकत्रीत करून त्यामधुन परतफेडीची क्षमता काढली जाते.

आधीच असणारे कर्ज

तुमच्याकडे कोणतेही आधीचे कर्ज असेल, तर त्याचा तुमच्या परतफेड क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, कारण तुमचे शिल्लक रहात असलेल्या उत्पन्नामधुन (वरील उदाहरणामध्ये 8000 रूपये) आधीच्या कर्जा संबंधीत समान मासीक हफ्त्यांमध्ये (EMI) कमी होईल. बरेचदा, तरिसुद्धा, 6 महिने किंवा यासारखे कमी कालावधीचे कर्ज गृहीत धरल जात नाही.

अवधि

जास्त अवधिसाठी जास्त कर्ज रक्कम कशी घेऊ शकता हे तुम्हाला समजले असले तरिही, याच्या मर्यादा समजणे महत्वाचे आहे.

उपलब्ध कर्जावरील अधिकतम अवधि हा तुम्ही अर्ज करतेवेळीच्या तुमच्या वयावर अवलंबुन असते. पगारी कर्मचाऱ्यांसाठी वय 58 वर्षे/60 वर्षे (तुमच्या कंपनीमध्ये सेवानिवृत्तीसाठी जे वय ठरविले असेल त्याप्रमाणे) पेक्षा जास्त असायला नको आणि स्वयंरोजगारीत व्यवसायीकांसाठी 65 वर्षांपेक्षा जास्त वय नको.

हे लक्षात ठेवून, शक्य तेवढा अधिकतम अवधि अधिकतम रकमेची खात्री करून देईल.

आमच्याकडे इएमआय (EMI) कॅलक्युलेटर टूल आहे, जो तुम्हाला तुमच्या मासीक परतफेडीच्या पर्यायाची योग्य रक्कम काढून देईल.

परतफेड पर्याय.

योग्य रकमेसाठी, आम्हाला कॉल करा, किंवा आम्हाला भेट द्या, आणि तुम्हाला ही तपशिल माहिती देण्यासाठी आम्हाला आनंद होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*
Website