तुम्हाला आमच्या कडून कर्ज मिळण्याकरीता एक विनंती आवेदन अर्ज भरावा लागेल. हा अर्ज आमच्या कोणत्याही शाखेमधुन मिळवला जाऊ शकतो किंवा येथे डाऊनलोड केला जाऊ शकतो. या अर्जामध्ये काही विभाग आहेत.

मुख्य आवेदन: हा विभाग म्हणजे विशीष्ट योजने अंतर्गत विशीष्ट कर्ज रकमेबद्दल विचारणारे औपचारीक विधान आहे. येथे योजनेची तपशिल माहिती मिळवली जाऊ शकते.

अर्जदारांची संख्या: कमीतकमी एक अर्जदार आवश्यक आहे. तरिसुद्धा, सह-अर्जदार असणे शक्य आहे.

वैयक्तीक माहिती: प्रत्येक अर्जदार आणि सह-अर्जदार यांसाठी, विविध वैयक्तीक माहिती, निवास माहिती आणि रोजगार माहिती आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे पॅन कार्ड किंवा मतदान ओळख क्रमांक जमा करणे आणि तुमचे वार्षिक उत्पन्न घोषीत करणे आवश्यक आहे.

आर्थीक माहिती: अर्जदार आणि सह-अर्जदार यांची मालमत्ता व जबाबदारी यादी देणारी साधी सारणी देणे गरजेचे आहे. तुमची कर्ज मिळण्याची पात्रता व रक्कम काढण्यासाठी तुमच्या पगाराची पावती, कर परतावा (टॅक्स रिटर्न) इत्यादीं बरोबर ही सारणी जुळवली जाईल. यासोबतच, तुमच्या आधीच्या कर्जाची माहिती देणे सुद्धा आवश्यक आहे.

मालमत्ता तपशील: मालमत्तेचे स्थान, जेथे त्याची माहिती स्पष्ट आहे किंवा नाही, प्लॉटचे क्षेत्रफळ (स्वतः बांधकाम करणार असल्यास) किंवा फ्लॅट चे क्षेत्रफळ आणि इतर अशा प्रकारची माहिती भरणे गरजेचे आहे.

सामान्य घोषणा: हे मालमत्तेचा वापर कसा करणार आणि मालमत्तेची सद्यस्थिती यांबद्दलचे साधे प्रश्न आहेत.

संदर्भ: तुमच्या सोबत काम करणाऱ्या, किंवा तुम्हाला व्यवसायामध्ये आणि/किंवा वैयक्तीक नात्यामध्ये ओळखणाऱ्या व विशीष्ठ वेळेसाठी वैयक्तीक क्षमता असलेल्या कमीतकमी दोन लोकांचे संदर्भ गरजेचे आहे.

अतिरिक्त माहिती: तुमच्या आवेदन अर्जा सोबत तुमच्या नियमीत वेतन खात्याची माहिती द्यावी लागेल.

फोटोग्राफ: अर्जदार आणि सह-अर्जदार यांचा कमीतकमी एक फोटो स्वाक्षरीसह जमा करणे गरजेचे आहे.

साक्षीदार अर्ज: प्रत्येक साक्षीदाराची वैयक्तीक माहिती, संपर्क माहिती, आणि आर्थीक माहिती एका स्वतंत्र अर्जामध्ये देणे गरजेचे आहे, जो अर्ज मुख्य आवेदन अर्जासोबत डाऊनलोड केला जाऊ शकतो.

नियोक्त्याची माहिती: नियोक्ता जर यादीमधील कंपनीचा किंवा प्रसिद्ध कंपनीचा मालक नसेल तर नेहमी त्याची व्यवसाय, स्पर्धक, कार्यालयांची संख्या, एकूण विक्री इत्यादींची थोडक्यात माहिती घेणे उचित ठरते. सामान्यपणे, संकेतस्थळावर दिलेली कंपनी प्रोफाईल पुरेशी असते. तुम्ही सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जमा करत आहात याची खात्री करण्यासाठी कागदपत्र तपाससूची चा वापर करा आणि मूळ कागदपत्रे तुमच्या आवेदनासोबत जमा करा. बँक विवरणपत्र: हे कमीतकमी 12 महिन्यांच्या कालावधीसाठी जमा करणे आवश्यक आहे. त्याची कार्य स्तर (व्यवहारांची संख्या आणि स्वरूप), बँकेमधील शिल्लक, चेक परतावा, चेक बाऊन्स आणि देयकाचा कालावधी ( उदा. ठरावीक कालावधीमध्ये जमा केलेला पगार) इत्यादींची बारकाईने तपासणी केली जाते.

वैयक्तीक चर्चा सामान्यपणे, तुमची आमच्यापैकी एका कार्यकर्त्यासोबत मुलाखत होईल, ज्यामध्ये तुमच्या अंक आणि प्रक्रिया यांबद्दलच्या शंकांचे निरसन केले जाईल. काही उदाहरणांमध्ये, तुम्हाला अतिरीक्त साक्षीदार किंवा माहिती देण्यास सांगीतले जाईल.

पडताळणी दिलेल्या माहितीसाठी, विशेषत्वाने खालील उद्देशांसाठी दिलेल्या माहितीसाठी त्या ठिकाणी जाऊन पडताळणी केली जाईल –

  • रहिवासी पत्ता
  • कार्यालय पत्ता
  • रोजगार पडताळणी
  • बँक खाते पडताळणी
  • निवास आणि कार्यालय दूरध्वनी क्रमांक
  • मालमत्ता पत्ता
  • आर्थीक

काहीवेळा तुम्ही आवेदन अर्जामध्ये दिलेल्या संदर्भासाठी तातडीची पडताळणी केली जाते. तुमचे सर्व दिलेले पुरावे वैध असल्याचे समजल्यावर, तुम्ही आणि आमच्यामध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होते.

कर्ज मंजुरी तुमच्या आवेदनावर प्रक्रिया झाल्यावर आणि तुमची परतफेड क्षमता आणि कर्ज रक्कम यांनूसार, अंतीम कर्ज रक्कम तुम्हाला सांगीतली जाईल. त्यानंतर तुम्हाला ज्या अटी व शर्तीं अंतर्गत कर्ज मंजूर झाले त्यांसह मंजुरी पत्र देण्यात येईल. या नियम व अटी कर्ज वाटप होण्यापूर्वी पूर्ण करायला हव्यात.

प्रस्ताव पत्र या प्रस्ताव पत्रामध्ये कर्ज रक्कम, व्याजदर, अवधि, परतफेडीचा प्रकार आणि इतर माहिती व विशेष परिस्थती यांचा समावेश असेल. मंजूरी पत्रामध्ये दिलेल्या नियम व अटींप्रमाणे काही कागदपत्र मागवले असल्यास त्यांसह आमच्याकडून दिलेल्या प्रमाणीत स्वरूपामध्ये तुमच्याद्वारे स्वीकृती पत्र मागवले जाईल. हे तुमच्या कर्ज प्रस्तावासाठीचे केवळ आर्थीक मान्यता असते. तुम्ही प्रस्ताव मान्य केल्यानंतर आणि गहाण ठेवलेली मालमत्ता कायदेशीर व तांत्रीकपद्धतीने स्पष्ट असल्यानंतर तुम्हाला कर्ज वाटप केले जाईल.

कायदेशीर कागदपत्र जमा करणे तुम्ही प्रस्ताव मान्य केल्यानंतर, तुम्हाला मूळ कागदपत्रे जमा करावे लागतील, ज्यामुळे आमच्याकडे कर्जाची संपूर्ण परतफेड होईपर्यंत सुरक्षा राहील. कर्जाच्या अटींप्रमाणे आवश्यक इतर कागदपत्रे या टप्प्याला जमा करावे लागतील.

करारावर स्वाक्षरी प्रक्रियेनूसार करार व इतर कागदपत्रे यांवर स्वाक्षरी करावी लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*
Website