Ashok-K-Roy-e1430743770609श्री.अशोक के. राय : मंडळाचे अध्यक्ष

भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर येथून बी.टेक (ऑनर्स) केलेले कृषी अभियंता आहेत आणि भारतीच विमा संस्थेचे सेवक म्हणून काम करत आहेत. श्री.अशोक के.राय हे 1979 मध्ये सरळसेवा भरती अधिकारी म्हणून भारतीय विमा व्यवसायामध्ये रुजू झाले. जून 2008 मध्ये महाव्यवस्थापक म्हणून जी.आय.सी. मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यानी ओरीएंटल विमा कंपनीमध्ये 29 वर्षे विविध पदांवर, प्रामुख्याने संपत्ती हमीदार म्हणून कार्य केले.

डिसेंबर 2011 मध्ये श्री. राय यांनी भारतीय विमा कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्विकारला. ते जानेवारी 2012 ला जी.आय.सी. चे सी.एम.डी. म्हणून स्थानापन्न झाले आणि त्या पदावर निश्चित असतानाच एप्रिल 2012 मध्ये जी.आय.सी. चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून स्थानापन्न झाले.

श्री. राय हे मालमत्ता व्यवस्थापन कंपनी लिमीटेड चे अध्यक्ष सुध्दा आहेत. ते काही कंपन्यांच्या मंडळावर संचालक सुध्दा आहेत, त्यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ, भारतीय शिपींग रजिस्टर, पूर्व आफ्रिका पूनर्विमा कंपनी लिमीटेड, केनइंडीया ऍश्युरन्स कंपनी लिमीटेड, आशियायी पूनर्विमा महामंडळ अणि भारतीय इ.सी.जी.सी. लिमीटेड.

श्री. राय यांना टी.ए.सी. चे तांत्रिक उप समिती (अभियांत्रिकी) चे सदस्य केले आहे आणि कोअर विमा सोल्युशन (आय.एन.एल.आय.ए.एस.) च्या विकासात जवळीकीने सहयोगी आहेत. त्यांनी अग्नी आणि अभियांत्रिकीच्या विकासासाठीच्या कोअर गटाचे नेतृत्व सुध्दा केले आहे. निगम शासन, देवाणघेवाण कौशल्य आणि व्यवस्थापन बदलावरील काही प्रशिक्षण कार्यक्रमाचे वक्ता म्हणून कार्य केले. जी.आय.सी.तील मनुष्यबळ विकासातील त्यांच्या विविध उपक्रमांसाठी ते ओळखले जातात.

G-Srinivasan-e1430744038430श्री.जी.श्रीनिवासन : बी.कॉम, एफ.आय.आय.आय, ए.सी.एम.ए

श्री.जी.श्रीनिवासन यांनी 18 ऑक्टोबर 2012 पासून द न्यु इंडिया अॅश्यूरन्स कंपनी लिमीटेड च्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्विकारला.

न्यु इंडिया अॅश्यूरन्स कंपनी मध्ये अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असतानाच्या काळातच ते युनायटेड इंडिया इन्श्यूरन्स कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो च्या द न्यु इंडिया अॅश्यूरन्स कंपनी (टी.एन.टी.) लिमीटेड चे महाप्रबंधक म्हणून सेवा केली. त्यांना विमा क्षेत्रात 33 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. 28 जुलै, 2010 पासून ते भारतीच विमा महामंडळाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. ते न्यु इंडिया ऍश्यूरन्स कंपनी लिमीटेड (त्रिनिदाद आणि टोबॅगो), प्रेस्टीज ऍश्यूरन्स कंपनी, नायजेरीया आणि इंडिया इंटरनॅशनल कंपनी, सिंगापूर चे संचालक आहेत.

 

A-K-Saxena-e1430744347456डॉ.ए.के.सक्सेना :

डॉ.ए.के.सक्सेना हे 12 जुन, 2012 पासून आतापर्यंत ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनी लिमीटेड चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. डॉ.ए.के.सक्सेना यांना पूर्वीच्या ओरीएंटल इन्श्यूरन्स कंपनी लिमीटेड च्या महाप्रबधकपदी रुजू केले गेले आहे.

डॉ.ए.के.सक्सेना यांनी पशुवैद्यकीय शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि विधी मध्ये पदवी घेतली आहे. ते भारतीय विमा संस्थेचे सहाय्यक सदस्य सृध्दा आहेत.

डॉ.ए.के.सक्सेना यांनी 1979 या वर्षी द न्यु इंडिया ऍश्यूरन्स कंपनी लिमीटेड (एन.आय.ए.) अधिकारी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि त्यांनी फिलीपीन्स मधील मनीला येथील पदांव्यतिरीक्त नैरोबी येथील केनइंडिया ऍश्यूरन्स कंपनीसह उत्तर प्रदेश आणि मुंबई येथील न्यु इंडिया ऍश्यूरन्स कंपनीच्या विविध कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जबाबदार्या आणि कर्मचार्यांच्या जबाबदार्या हाताळल्या आहेत. ते सिंगापूर येथील इंडिया इंटरनॅशनल इन्श्यूरन्स पी.टी.इ. चे संचालक सुध्दा आहेत.

Milind-A-Kharat-e1430744581679श्री. मिलींद खारात:

श्री. मिलींद खारात – यांनी ऑक्टोबर मध्ये युनायटेड इन्श्यूरन्स कंपनी लिमीटेड अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्विकारला.

श्री. खारात हे मुंबई विद्यापिठातून अर्थशास्त्र आणि कायदेशास्त्राचे पदविधर आहेत. ते भारतीच विमा संस्थेचे सेवक सुध्दा आहेत.

श्री. खारात यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे 1979 च्या तुकडीचे सरळसेवा अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली आणि त्यापाठोपाठच त्यांनी विविध रुपरेषेच्या विविध स्तरावरील वेगवेगळी पदे सांभाळली त्यामध्ये न्यु इंडिया ऍश्यूरन्स कंपनी लिमीटेड चे प्रादेशिक प्रभारी, विभागीय व्यवस्थापक, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक इ. चा समावेश होता.

श्री खारात यांनी एका शृंखलेत फिजी आइसलँड, आणि जापान मधील टोकीयो येथील दोन आंतरराष्ट्रीय पदांवर कार्य केले. त्यांना 1995 ते 2001 पासूनच्या फिजीच्या वरिष्ठ व्यवस्थापक पदावरील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी फिजीच्या विमा परिषदेचे अध्यक्ष आणि फिजीच्या पुनर्विमा महामंडळाचे संचालक म्हणून कार्य केले आणि 1998 च्या फिजीच्या विमा कायद्याच्या दुरुस्तिमध्ये त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी फिजीच्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या जबाबदार गटावर फिजीतील रस्त्यांच्या सुरक्षेसाठी कार्यकारी सदस्य म्हणून कार्य केले.

श्री खारात यांना 2004 ते 2007 पासून न्यु इंडिया ऍश्यूरन्स कंपनी लिमीटेड च्या जापान मोहीमेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार देण्याते आले. ते जापानच्या गैर जीवन विमा मंडळाचे कार्यकारी समितीचे सदस्य होते आणि वर्ष 2007 च्या भारत-जापान मैत्री समारंभासाठीच्या वित्तिय समितीचे सदस्य होते.

त्यांनी मानव संसाधन, प्रशिक्षण, सागरी नौकापृष्ठ, मोटर आणि कायदेविषयक विभागाच्या क्षेत्रांमध्ये बराच अनुभव घेतला.

युनायटेड इंडिया इन्श्यूरन्स कंपनी लिमीटेडच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असतांनाच त्यांनी नवी दिल्लीच्या भारतीय कृषी विमा कंपनीतील अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्विकारला.

V-Ramasamy-e1430744616316श्री.व्ही.रामसामी :

व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (सनदी लेखापाल) वर्ष 1975 मध्ये युनायटेड इंडिया इंन्श्यूरन्स कंपनी लिमीटेड मध्ये सरळ सेवा भरती अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध क्षमतेने कार्य केले आणि 2005, मध्ये त्यांना अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाच्या श्रेणीत बढती मिळाली.

ते ऑक्टोबर 2005 ते मे 2009 पासून नॅशनल इन्श्यूरन्स कंपनी लिमीटेड चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले. त्यांच्या निवृत्तिनंतर ऑगस्ट पासून तिन वर्षांकरिता तमिळनाडूचे विमा लोकपाल म्हणून नियुक्त करण्यात आले.

 

Kamlesh-S-Vikamsey-e1430744700787श्री.कमलेश शिवजी विकमसी :

मुंबई विद्यापिठातील वाणिज्य पदविधर, चार्टर्ड अकाउंटंट (सनदी लेखापाल) म्हणून वित्त आणि जमाखर्च, कराधान आणि सामुदायीक सल्लागार सेवा इ. मध्ये 30 वर्षांचा अनुभव. ते न्युयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यु.एन.डी.पी.) च्या लेखापरिक्षण सल्लागार समितीचे सदस्य आहेत आणि भारतीच लेखापाल संस्था (आय.सी.ए.आय.)च्या अपील अधिकाराचे सदस्य सुध्दा आहेत. सन 2005-06 च्या दरम्यान त्यांची आय.सी.ए.आय. चे अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि 2004-05 च्या दरम्यान उपाध्यक्ष म्हणून सुध्दा. ते सन 1998 ते 2007 पासून आय.सी.ए.आय. च्या केंद्रीय समितीचे सदस्य म्हणून सुध्दा निवडून आलेले आहेत. त्यानंतर ते 2007-09 दरम्यान आशिया आणि पॅसिफिक लेखापाल (सी.ए.पी.ए.) च्या राष्ट्रमंडळाचे अध्यक्ष राहीले आहेत आणि 2005-07 च्या दरम्यान सी.ए.पी.ए. चे उपाध्यक्ष होते. सन 2005-08 च्या दरम्यान ते आंतरराष्ट्रीय लेखापाल संघाच्या मंडळाचे सदस्य होते. सन 1982 पासून ते एम/एस खीमजी कुंवरजी आणि कंपनीशी संबंधीत वरिष्ठ भागीदार म्हणून होते. त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध सल्लागार आणि तज्ञ समित्यांचे सदस्य म्हणून सेवा केली आहे, त्यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या नजरचुकीत शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाकरिता मार्गदर्शक समितीचा समावेश आहे.

 

Mona-Bhide-e1430744889882श्रीमती.मोना भिडे :

बी.कॉम, एल.एल.बी. मुंबई विद्यापिठ, एल.एल.एम. उत्तरपूर्व विद्यापिठ, स्कूल ऑफ लॉ शिकागो, त्या दवे आणि गिरीश आणि कंपनीच्या व्यवस्थापकीय भागीदार आहेत., आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामुदायिक कायद्यांवर केंद्रीत अशी कायदे संस्था आहे. त्या विविध बँका आणि वित्तिय संस्थांच्या सल्लागार आहेत.

त्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या वकील परिषद, बॉम्बे बार असोसीएशन, इंटरनॅशनल स्वॅप्स अँड डेरीव्हेटीव्ह्ज असोसीऐशन, इंटरनॅशनल बार असोसीऐशन, न्युयॉर्क स्टेट बार असोसीऐशन, इंटर पॅसिफिक बार असोसीऐशन आणि एशिया पॅसिफिक लोन मार्केट असोसीऐशनच्या सदस्य आहेत.

त्यांनी बँकिंग गुंतवणूक आणि विसंवाद आणि कायदेशीर व्यवसायाचे जागतीकीकरणाच्या क्षेत्रातील अमेरीकेच्या बार फाउंडेशनसह प्रचंड कार्य केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय लॉ फर्म, सेडविक, डिटर्ट मोरान आणि अर्नाल्डसह सुध्दा कार्य केले.

त्या ग्लोबल काउन्सील 3000 मधील भारतातील सामुदायिक आणि आर्थिक प्रकल्प, देवघेव संपादन आणि विलिनीकरण, पुनस्संरचित आणि दिवाळखोर विधी व्यावसायीक आणि सामुदायिक देवघेव व्यावसायिकांसाठी उच्च शिफारसपात्र वकीलांपैकी एक आहेत.

संपादन आणि विलिनीकरण, सामुदायिक, बँकिंग आणि आर्थिक वैयक्तिक कर्ज आणि कायदेशीर 500 द्वारे विवाद विघटन आणि आशिया लॉ प्रोफाईलद्वारे वकीलांना कर्जपुरवठा इत्यादी संदर्भात त्यांना मानांकित कले गेले आहे.

Warendra-Sinha-e1430745021436श्री.वरेन्द्र सिन्हा – व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) :

श्री.वरेन्द्र सिन्हा दिल्ली विद्यापिठाच्या हंसराज महाविद्यालयाचे माजी विद्यार्थि आहेत आणि नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापिठाचे एक अधिस्नातक आहेत. त्यांनी सन 1982 मध्ये ओरिएंटल इन्श्यूरन्स कंपनी लिमीटेड मध्ये रुजू झाले आणि देशाच्या विविध भागांमधील शाखा, विभाग आणि प्रदेश प्रभारी 2008 पर्यंत उत्तमरित्या कार्य केले. त्यादरम्यान ते केनिया येथील नैरोबीच्या केनेडीया ऍश्यूरन्स कंपनी लिमीटेडच्या प्रतिनिधीमंडळावर होते. 2008 मध्ये महाव्यवस्थापक म्हणून पदोन्नतीवर असतांना विपनन, प्रसिध्दी, आणि बी.पी.आर. खाते पाहिल्यावर त्यांना कोलकाता येथील नॅशनल इन्श्यूरन्स कंपनी लिमीटेडच्या मुख्य कार्यालयात हलविण्यात आले.

श्री.सिन्हा हे जी.आय.सी. मध्ये ऑक्टोबर, 2012 ला महाव्यवस्थापक म्हणून रुजू झाले आणि त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक म्हणून गृहनिर्माण वित्त लिमीटेडच्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.

याशिवाय श्री.सिन्हा हे भारतीय इंश्यूरन्स संस्थेशी जुळले असल्याने खेळ, संगित, वाचन आणि प्रवासाचा आनंद घेतात. आदर्श ग्राहक संबंध, संघव्यवस्थापन क्षमता, मजबूत संवादासह उत्तम नेतृत्व कौशल्य सुध्दा श्री.सिन्हा यांनी दाखविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*
Website