अन्न, वस्त्र आणि शिक्षण या इतर तीन गरजांसह गृहनिर्माण ही सुध्दा प्रत्येक मनुष्यासाठी त्यांपैकी एक मुलभूत गरज आहे. गृहनिर्माण हा एक महत्वाचा घटक आहे आणि दर्जा दर्शविणारा एक परिमाण आहे. हे हस्तक्षेप आणि उपक्रमशील धोरणांच्या दृष्टिने एक महत्वाच्या क्षेत्राच्या रुपात मानले जाते. एक सामाजिक गरज म्हणून गृहनिर्माणाची प्रासंगिकता फार पूर्वीपासून ओळखली गेली आहे आणि हा अश्मयुगीन काळापासून मानवजातीद्वारा केल्या गेलेल्या नवकल्पना आणि शोधांचा परिणाम आहे.

गृहनिर्माण ही मानवजातीच्या अत्यावश्यक गरजांपैकी एक असल्यामुळे, लोकसंख्या वाढ आणि राहणीमानाच्या दर्जासह निवाऱ्याची मागणीसुध्दा वाढते आणि म्हणूनच घर खरेदीसाठी भांडवलाची गरज निर्माण झाली आहे. घर ही सर्वोत्तम गुंतवणूक समजून आणि घरातील बचत किंवा आपल्या कष्टाच्या पैशाची गुंतवणूक समजून त्या वस्तुस्थितीच्या आधारे गृहनिर्माण क्षेत्राच्या महत्वाचा निवाडा केला जाउ शकतो. घर खरेदीसाठीच्या भांडवलाच्या गरजेतूनच विशेष गृहनिर्माण वित्तीय संस्थांची उत्पत्ती झाली. आज त्या कंपन्या गृहनिर्माण वित्त संस्था (एच.एफ.सी.) म्हणून ओळखल्या जातात, गृहनिर्माण क्षेत्राच्या वाढीसाठी अनेक वर्षांच्या योगदानातून त्यांची कर्ज योजना चरणबध्द आहे. फक्त गृहनिर्माण क्षत्रासाठीच्या कर्जातील त्यांच्या कौशल्यामध्येच त्यांची तिव्रता सामावलेली आहे. काही तर गृहनिर्माण वित्त लिमीटेड (जी.आय.सी.एच.एफ.एल) जी.सी.आय. ची पार्श्वभूमी आहेत.

जी.सी.आय. गृह वित्त लिमीटेडचा 12 डिसेंबर 1989 रोजी जी.आय.सी गृह वित्त लिमीटेड म्हणून समावेश करण्यात आला. 16 नोव्हेंबर 1993 ला लागू केलेल्या संस्थापनाच्या ताज्या प्रमाणपत्रास अनुसरुन तेव्हाचे नाव बदलून आताचे नाव ठेवण्यात आले होते. वैयक्तिक आणि इतर सहकारी क्षेत्रास प्रत्यक्ष कर्जपुरवठा करण्याच्या माध्यमातून भारतातील गृहनिर्माण क्षेत्राच्या कार्याला गती प्राप्त करण्याच्या उद्देशाने कंपनी या क्षेत्रामध्ये उतरली आहे. निवासी उद्देशासाठी घरे/सदनिका बांधकामात गुंतलेल्या व्यक्ती/घटकांना वैयक्तीक गृह कर्ज उपलब्ध करुन देणे हा जी.आय.सी.एफ.एच.एल. चा प्राथमिक उद्देश आहे. भारतातील गृहनिर्माणाच्या भविष्यासाठी कंपनीने एक दृष्टि आत्मसात केली आहे. कंपनीची प्रगति आणि यश हे जी.आय.सी.एच.एफ.एल च्या खालील तत्वांवर आधारीत आहे असा कंपनीचा विश्वास आहे.

  • सेवाभिमुख वातावरणासह ग्राहक अनुकूल वित्तिय योजनांच्या माध्यमातून एक अग्रगण्य सहाय्यक नागरीक म्हणून गृहनिर्माण उपक्रम राबविणे.
  • एका अग्रगण्य सहाय्यक नागरीकाला त्याचा नैतिक दर्जा परावर्तीत होण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणात स्वतःला मजबूत करावे लागते आणि वाढ घडून आणावी लागते.
  • संपत्ती जमवणे आणि भागधारकांना पुरस्कृत करण्यासाठी

कंपनी भारतीच विमा महामंडळाद्वारे प्रचलित करण्यात आली आहे आणि त्याच्या आधीच्या अनुषांगीक नावाने म्हणजे दुसर्या शब्दात, नॅशनल इंश्युरन्स कंपनी लिमीटेड, द न्यु इंडीया इन्श्युरन्स कंपनी लिमीटेड, ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनी लिमीटेड आणि युनायटेड इन्श्युरन्स कंपनी लिमीटेड आणि एकत्र युटीआय, आय.सी.आय.सी.आय, आय.एफ.सी.आय, एच.डी.एफ.सी आणि एस.बी.आय. यांपैकी सर्व प्रारंभीक भाग भांडवलासाठी योगदान देत आहेत.

जी.आय.सी.एफ.एल. च्या व्यवसायासाठी संपूर्ण देशात 53 शाखा आहेत. कंपनीला मजबुत विपणन गट लाभलेला आहे, जी विक्री सहचारी (एस.ए.) द्वारे पुढे सहाय्यता करत आहे. वैयक्तिक कर्जदारांना वित्त पुरवठा करण्यासाठी कंपनीने बांधकाम व्यावसायिकांशी संगनमत केले आहे. विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने सहकारी संस्थांशी सुध्दा संगनमत केले आहे

कंपनीच्या इतिहासातील प्रमुख घटना
वर्ष घटना
1989 कंपनीचे नाव जी.आय.सी. गृह वित्त लिमीटेड मध्ये समाविष्ट करण्यात आले.
1989-91 कंपनीने 8 जागी आपल्या उपक्रमास सुरुवात केली.
1991-92 कंपनीने कर्मचारी आणि बांधकाम व्यावसायिकांची गृहनिर्माण योजना सुरु केली.
1992-93 कंपनीचे नाव बदलून जी.आय.सी. गृहनिर्माण वित्त लिमीटेड असे ठेवण्यात आले. कंपनीकडून अपना घर योजना सुरु करण्यात आली.
1993-94 कंपनीने 1:1 चे अधिकार वाटप केले, तीचे भांडवल 10 करोड रूपयांच्या पुढे गेले आहे.
1994-95 कंपनीने तीचा पहीलावहीला आय.पी.ओ. तयार केला आणि 40 कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवलाची जमवाजमव केली.
1996-97 कंपनीने संगणकीकरणाच्या प्रक्रियेस सुरुवात केली.
2003-04 संवितरीत रकमा, फायदेशीरता आणि उद्योगवाढीसाठी कर्जमंजूरीमध्ये 40 टक्यांपेक्षा जास्त दराची वाढीव अशी नोंद कंपनीने केली. परिणामी कंपनीने वैयक्तिक गृहनिर्माण कर्जामध्ये 500 कोटी रुपयांचा वार्षिक व्यवसाय पार केला आणि एकूण संविभागाने 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
2004-05 संवितरीत रकमा, फायदेशीरता उद्योगवाढीसाठी कर्जमंजूरीमध्ये 40 टक्यांपेक्षा जास्त दराची वाढीव अशी नोंद कंपनीने केली. घेतलेल्या प्रत्येक 2 शेअर्ससाठी एका समभाग गुणोत्तरात 16 रुपयांच्या 89,75,561 समभाग शेअर्स चे हक्क लागू आहेत. भरणा केलेल्या भांडवलामध्ये रुपये 26.93 कोटींची वाढ झाली आहे.
2005-06 एन.पी.ए. आणि नफयाच्या मजबुतीकरणावर भर.
2006-07 लागू असलेले हक्क  - 30 रुपये प्रति भागाच्या अधिमूल्यावर प्रत्येकी 10 रु. नगदीच्या बाह्य किंमतीचे समभागांचे क्रमांकन 2,69,25,533 एकत्रितपणे रु. 107,70,21,320 ला कंपनीच्या समभागधारकांना प्रत्येकी 1 समभागासाठी 1 समभाग गुणोत्तरात हक्क आधारावर जारी करण्यात आले आणि 19 मे, 2006 ला बहाल करण्यात आले. फुढील लागू हक्क, कंपनीच्या भाग भांडवलामध्ये 26.93 कोटींनी वाढ झाली आणि भागाचे गुणोत्तर 80.78 कोटींनी वाढले. 31 मार्च, 2007 ला भरणा केलेले भांडवल 53.86 कोटी रुपयांपर्यंत पाहोचले.मागील वर्षीच्या 15 टक्क्यांच्या तुलनेत या वर्षी जाहीर लाभांशाची टक्केवारी 30 टक्क्यांनी वाढली आहे.या वर्षभरात कंपनीने महाराष्ट्रातील मुंबईच्या पश्चिम उपनगरातील विरार मध्ये शाखा उघडली आहे.
2007-08 वैयक्तिक कर्ज समविभागाने या वर्षभरामध्ये 2000 कोटींचा आकडा पार केला आहे आणि 31 मार्च, 2008 ला 2427.35 कोटींपर्यंत पाहोचला आहे.
2008-09 वैयक्तिक कर्ज समविभागाने या वर्षभरामध्ये 2500 कोटींचा आकडा पार केला आहे आणि 31 मार्च, 2009 ला 2682 कोटींपर्यंत पाहोचला आहे
2009-10 वर्षभरामध्ये कंपनी तीची पहिली शाखा गुजरातच्या बडोदा मध्ये उघडते आणि महाराष्ट्रातील नागपूर आणि नाशिक येथे सुध्दा शाखा उघडून आपले जाळे पसरवते. जीवन विमा कंपनीशी संगनमताने फात्र कर्जदारांना असामान्य अशा कर्ज रकमेच्या प्रमाणावर आवर घालण्यासाठी पर्यायी जीवन विमा गटांची ओळख करुन देणे.
2010-11 मंजूर झालेल्या वैयक्तिक कर्जांनी वर्षभरात 1000 कोटींचा टप्पा गाठला आहे. मंजूर झालेल्या वैयक्तिक कर्जांनी वर्षभरात 1069 कोटींचा टप्पा गाठला आहे. वैयक्तिक कर्ज संविभागाने 3000 कोटींचा टप्पा गाठला आहे आणि 31 मार्च, 2011 ला 3406 कोटींपर्यंत पोहोचला आहे.जाहीर लाभांश हे 10 टक्क्यांच्या एकवेळच्या विशेष लाभांशाच्या 55 टक्के जाहीर लाभांशामध्ये समावेशक आहे.दुसरी शाखा राजस्थानातील जोधपूर येथे उघडण्यात आली आणि दुसरी शाखा पश्चिम बंगाल मधील दुर्गापूर येथे उघडण्यात आली आणि पुढील विस्तार महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे शाखा उघडून करण्यात आला.
2011-12 वर्षभरामध्ये वैयक्तिक कर्ज संवितरणाने 1000 कोटी रु. चा टप्पा पार केला, आणि ते एका वर्षात 1069 कोटी रु.वर जाउन पाहोचले. वैयक्तिक कर्ज संविभागाने 3500 कोटींचा टप्पा गाठला आहे आणि 31 मार्च, 2012 ला 3864 कोटींपर्यंत पोहोचला आहे.महाराष्ट्रात मुंबई उपनगरातील पनवेल जवळ कंपनीने नवीन शाखा उघडून आपल्या व्यवसायाचा विस्तार केला.
2012-13 कंपनी आपली पहिली शाखा मध्ये प्रदेशातील इंदूर येथे सुरु करते.
2013-14 कंपनी आपली 43 वी शाखा पाटण्यामध्ये उघडते.
2013-14 कंपनी आपली 44 वी शाखा अहमदाबाद मध्ये उघडते.
2013-14 कंपनी आपली 45 वी शाखा कल्याण येथे उघडते.
2013-14 कंपनीने बोरिवलीमध्ये आपली 46 वी शाखा उघडली.
2013-14 कंपनीने डेहराडूनमध्ये आपली 47 वी शाखा उघडली.
2014-15 कंपनीने मीरतमध्ये आपली 48 वी शाखा उघडली.
2014-15 कंपनीने बोईसरमध्ये आपली 49 वी शाखा उघडली.
2014-15 कंपनीने गाझियाबादमध्ये आपली 50 वी शाखा उघडली.
2014-15 कंपनीने मडगावमध्ये आपली 51 वी शाखा उघडली.
2014-15 कंपनीने द्वारकामध्ये आपली 52 वी शाखा उघडली.
2014-15 कंपनी या वर्षी रजत जयंती साजरी करीत आहे.